ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय? ; निलेश राणेंचा टोमणा

Nilesh Rane criticise Uddhav Govt

मुंबई :- कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची (Uddhav govt) घोषणा केली. काही प्रमाणात आता लॉकडाउनही शिथिल करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार नवनवे नियम घालून देत आहे किंवा त्यात परिस्थिती अनुरूप बदल देखील केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात पडत आहेत. याच मुद्द्यावरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

एकीकडे राज्य सरकार कोकणात जाणाऱ्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकरमान्यांना मुंबईत (Mumbai) परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन नियम लावत आहे. ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय, अशा शब्दात राणे यांनी सरकारवर निशाणा साधला.

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारनं क्वारन्टाईन कालावधीत सवलत दिली होती. 14 दिवसांवरून तो कालावधी 10 दिवसांवर आणला होता. मात्र त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन नियम मुंबई महापालिकेने लावला आहे.

ज्या त्या भागातली परिस्थिती पाहून तिथल्या जिल्हा प्रशासनाने कोरोनासंबंधातली नियमावली तसंच लॉकडाऊन संबंधातील नियम आखावेत, असं राज्य सरकारने सांगितलं आहे. परंतू महाराष्ट्रातल्या अनेक भागांतली परिस्थिती वेगवेगळी असल्याने नियम देखील बदलत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागिरिकंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ही बातमी पण वाचा : मग कोकणात इतके लोक का पाठवताय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER