महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

Nilesh Rane-Thackeray goverment.jpg

मुंबई :- आग्य्रामधील संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली. हाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात; मराठा आरक्षणावर का नाही? निलेश राणेंचा सवाल

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसे काही होईल वाटत नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी राज्य सरकारला थेट ‘मुघलांची सत्ता’ अशी उपमा दिल्याने ठाकरे सरकार या टीकेला काय प्रत्युत्तर देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER