‘अति तिथे माती’… शिवसेनेचा अंत जवळ आलाय- निलेश राणे

Nilesh Rane-Shiv Sena.jpg

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कट्टर विरोधक नारायण राणेंचे पुत्र, भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर पुन्हा घणाघात केला आहे. काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून (Nanar refinery project) तर आज ड्र्ग्स प्रकरणावरून निलेश राणेंनी शिवसेनेवर आरोप केले आहेत. काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती’… शिवसेनेचा अंत जवळ आलाय, अशा शब्दांत निलेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाची चौकशी सुरू असताना या प्रकरणाला ड्रग्जचा अँगल मिळाल्यानंतर सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. रोज कुणा ना कुण्या कलाकाराचे नाव या प्रकरणात पुढे येत आहे.

कलाकारच नाही तर ड्रग्स प्रकरणात शिवसेनेच्या एका उपनेत्याच्या मुलाची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. त्या वृत्ताचा आधार घेत निलेश राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. “काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. ड्र्ग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस अशी आजच्या शिवसेनेची ओळख बनली आहे. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती’… शिवसेनेचा अंत जवळ आलाय.” असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. एकेकाळी शिवसेनेतूनच मोठे झालेले राणे, आता शिवसेनेचे सर्वांत मोठे शत्रू आहेत . शिवसेनेवर टीका करण्यासाठी ते एकही संधी सोडत नाहीत. कालच नाणार रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. तर आज ड्रग्जप्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER