स्वातंत्र्य लढ्यात बाळासाहेब होते का? शिवसेनेला निलेश राणेंकडून प्रत्युत्तर

Nilesh Rane - Sanjay Raut

मुंबई : वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच; पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? १९४७ साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. अशी थेट टीका शिवसेनेने आजच्या ‘सामना’तून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली आहे.

बाळासाहेब विद्यर्थ्यांना म्हणाले होते, ‘यासाठी इंग्रजी शिका’

आता शिवसेनच्या या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी पलटवार केला आहे. निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिप्रश्न केला आहे. यावर त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, बाळासाहेब होते का स्वातंत्र्य लढ्यात? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत इंदिरा गांधीजींशी मांडवली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोक विसरले नाहीत- अशा शब्दांत राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.