
मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या टीकेला माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक राऊतांनी फक्त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे. ते चिपळूण येथे बोलत होते.
कोकणात राणेंनी मेडिकल कॉलेज आणले, उद्योग आणले, अनेकांना रोजगार मिळवून दिला. विनायक राऊतांनी बालवाडी तरी आणली का? राऊतांना केवळ आरोप करता येतात. त्यांना त्यासाठीच पाठवलं आहे. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) लाटेत निवडून आले आहेत, असं निलेश राणे म्हणाले.
विनायक राऊतांनी केला होता गौप्यस्फोट
नारायण राणे (Narayan Rane) हे भाजपमध्ये का गेले याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला होता. तत्कालीन काँग्रेसचे व सध्याचे भाजपचे आमदार राणे सुपुत्र नितेश राणे यांनी मुंबईतील एका व्यक्तीला १२ कोटींना फसविल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांना तुरुंगात धाडणार होते, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता.
शिवसेनेचे माजी आमदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाडिक कुटूंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 12, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला