.. याला चिंधी विचार म्हणतात साहेब, निलेश राणेंचे अजित पवारांवर टीकास्त्र

मुंबई :- माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. देशात मोगलाई आहे का या अजित पवारांच्या सवालावरुन निलेश राणेंनी निशाणा साधला.

राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं. इतकंच नाही तर “परवा भाषणात कुठेतरी मी अनेकवेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही असंही अजित पवार म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला, असे राणे म्हणाले .

अजित पवार काल अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का , असा संतप्त सवाल पवारांनी उपस्थितीत केला होता.

ही बातमी पण वाचा : अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं ; महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी ? 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER