हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका

Nilesh Rane & Uddhav Thackeray

मुंबई : हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, असा सवाल करत बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड (Beed Acid Attack). हल्ल्याचा भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh rane) यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. हाथरसवरुन राजकारण करणारे आता कुठं गेले?, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे .

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले , बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला अ‌ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत”.

दरम्यान बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा अत्यंत वेदनादायी प्रकार घडला आहे. अखेर 12 तासानंतर तिची मृत्यूशी झुंज संपली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER