‘सत्तेची मस्ती बघा, आयुष्यभर कोण सत्तेत राहत नाही !’ निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्ला

Nilesh Rane-uddhav thackeray

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) वाद सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे कार्टून पोस्ट केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण (Retired Navy officer beaten) केल्याची घटना कांदिवली येथे घडली आहे. या प्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत: तक्रार दिली आहे. यावर निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.‘सत्तेची मस्ती बघा, आयुष्यभर कोण सत्तेत राहत नाही… सत्ता जेव्हा बदलेल तेव्हा लपायला जागा मिळणार नाही लक्षात ठेवा. जिथे दिसाल तिथे फटके खाल तो दिवस लांब नाही.’ अशी सडकून टीका राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER