निलेश लंके यांच्या कामामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ ; जयंत पाटलांकडून कौतुकाची थाप

Jayant Patil - Nilesh Lanke

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची कोविड केअर सेंटरमधील सेवा सध्या राज्यभर गाजत आहे. सेंटरमध्ये रुग्णांसोबतच मुक्काम करून सेवा देत असलेल्या लंके यांच्या उपक्रमांना सर्वत्र प्रसिद्ध मिळत आहे. त्यांच्या कामाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही लंके यांनी केलेल्या कामाची स्तुती केली . लंके याच्या कामामुळे जनमानसात राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ होत असल्याचे म्हटले आहे .

कोरोना (Corona) संकट काळात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे उभारलेल्या अकराशे बेडच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरामुळे आ. लंके यांचे राज्याबरोबरच देश विदेशातही कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत आ. लंके यांना त्यांच्या कार्याचे प्रशस्तीपत्र देत त्यांचे कौतुक केले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रात म्हटले की,कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला करताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण करीत असलेल्या कार्याबद्दल सर्वप्रथम आपलं मनःपूर्वक अभिनंदन, आपले राष्ट्रीय नेते खा.मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण अशा प्रकारचे कार्य चालते. त्याचाच परिपाक आपण करीत असलेल्या कार्यातून दिसून येत आहेत. आपल्या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेशी जोडला जात आहे. तसेच आपल्या कार्यामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा उजळ होत आहे. याचा पक्षाच्या वाढीस व पुढील वाटचालीस मदतच होणार आहे. याचा मला आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button