आमदार निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट ; नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरु

Nilesh Lanke - Sharad Pawar

अहमदनगर : नगरमधील प्रसिद्ध असलेली वाहन संशोधन व विकास संस्था व्हीआरडीई (VRDE) चेन्नईला (Chennai) हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था येथून हलविण्यात येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी प्रयत्न सुरु केले. या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर एक मोठी केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याच्या धोका निर्माण होण्य्ची शक्यता वर्तविण्यात येत आहे . याच पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचं सविस्तर एक निवेदन दिले.

दिल्लीत संरक्षण विभागात प्रयत्न करून ही संस्था नगरमधून जाणार नाही, याची काळजी घ्यावी, नगरमधील एक हजार कुटूंबियाचे यामुळे नुकसान होणार असून त्याचा विकासावरही परिणाम होऊ शकतो, असे लंके यांनी पवारांना दिलेल्या निवेदनात म्हटले . राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेनेही या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

देशाच्या संरक्षण विभागात या संस्थेचे महत्त्व मोठे आहे. नगरमध्ये शेकडो एकर जागेत ही संस्था विस्तारलीय. या संस्थेचे येथून स्थलांतर झाल्यास या जागेचे काय होणार? की या जागेसाठीच स्थलांतर केले जात आहे, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दरम्यान आता मात्र ही संस्था बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिकांमधून या स्थलांतराला विरोध होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER