निलेश लंकेच्या रूपाने आदर्श भाऊ मिळाला; सुप्रिया सुळेंचे गुणगान

Supriya Sule-Nilesh Lanke

पारनेर :- आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांनी वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा वेबसाईटच्या माध्यमातून मतदारसंघातील तसेच राज्यभरातील जनतेसमोर सादर केला आहे.

या वेबसाईटचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी लंके यांच्या कार्याचा गौरव केला. मला राज्यात चांगले आदर्श काम करणारा व नावलौकिक मिळविणारा एक भाऊच या रूपाने मिळाला असल्याचे सांगून लंके यांच्या कामाचा गाैरव केला. आमदार लंके यांनी आपल्या आमदारपदाच्या वर्षपरिपूर्तीनिमित्त आतापर्यंत केलेल्या सामाजिक, शैक्षणिक तसेच इतरही कामांचा वेबसाईटद्वारे लेखाजोखा जनतेसमोर सादर केला आहे. या संकेतस्थळावर जाऊन मतदारसंघातील व संघाबाहेरील कुठलीही व्यक्ती लंके यांच्या वर्षभरातील राजकीय-सामाजिक व शैक्षणिक कामाचा लेखाजोखा पाहू शकणार आहेत. या वेळी लंके यांच्यासह तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या कार्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar), पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी गाैरव केला.

लंके आमदार झाल्यानंतर योजना, विकासकामे, सामाजिक व शैक्षणिक कार्य, कोरोना (Corona) संसर्गामुळे लॉक डाऊनमध्ये केलेले सामाजिक, शैक्षणिक कार्य, ऑनलाईन शाळा, पोलिस प्रशिक्षण केंद्र, कोविड केअर सेंटरमधून हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा देऊन महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या आमदारांचा संपूर्ण लेखाजोखा वेबसाईटच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. लंके यांनी निवडणुकीच्या आधीही मतदारसंघातील महिलांना विविध देवस्थानांच्या सहली घडवून आणल्या आहेत. त्यामुळे त्यांचे धार्मिक काम तालुक्यात प्रसिद्ध आहे. विधानसभेसाठी निवडून आल्यानंतर त्यांनी धार्मिक कामांबरोबरच सामाजिक कामांत आघाडी घेतली. कोरोनाच्या काळात कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी ते कायम पुढे राहिले. अडचणीच्या काळात लोकांना दिलेला धीर तालुक्यात इतर कोणत्याही नेत्यांना देता आला नाही. त्यामुळे समाजातून या कामांचे काैतुक होत आहे.

ही बातमी पण वाचा : सुसंस्कृत राज्यात मंदिराचे ताळे तोडण्याची भाषा वापरली जाते हे दुर्दैव – सुप्रिया सुळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER