महत्त्वाच्या खात्यांचा कारभार चालवतात निलांबरी, केडिया, आशर

Ashish Shelar

मुंबई :- राज्य सरकारचा कारभार सत्ताबाह्य केंद्रे चालवितात अशी चर्चा नेहमीच होत आली आहे. मंत्रालयापेक्षा महत्त्वाच्या डील या जवळच्या ट्रायडंट, ओबेरॉय हॉटेलमध्ये होतात असे मध्यंतरी कोणीतरी लिहिले होेते. ट्रायडंट हॉटेलच्या लॉबीमध्ये तुम्ही एखाद्यावेळी सहज जावून बसा आणि तासदीडतास येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर टाका. तुमच्या असे लक्षात येईल की काही अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठी की काय पण काही व्हीआयपी येताजाता दिसतील. त्यात राजकारणी मंडळी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारीदेखील असतात. आता एक बडा आदमी आहे म्हणतात त्याच्या नावाची आणि आडनावाची आद्याक्षरे ही एबीने सुरू होतात. दुसरी व्यक्ती आहे तिची आद्याक्षरे आहेत जेजे. या दोघांचा मंत्रालयात ठरणाºया कंत्राटांमध्ये, निविदांमध्ये मोठा  रोल असतो अशी चर्चा नेहमीच होत आली आहे. या दोघांमध्ये एबी जबरदस्त पॉवरफुल्ल आहे.

आता भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आणखी काही सत्ताबाह्य व्यक्तींचा उल्लेख थेट विधानसभेत बुधवारी केला. शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही पण भलतीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत निलांंबरी, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग कीर्तीकुमार केडिया हे चालवत आहेत. हे लोक आहेत तरी कोण असा प्रश्न त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना केला.  असा सवाल भाजपचे आशिष शेलार  यांनी बुधवारी विधानसभेत केला. राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात १५ अधिकारी, कर्मचारी इतर ठिकाणाहून घेतलेले आहेत. एमएमआरडीए सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर . ए. राजीव यांना कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार आपले सरकार कसे? असा सवाल त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : शासनाची चार खाती चालवणाऱ्या ‘त्या” व्यक्ती कोण? : आशिष शेलार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER