निकिता तोमर हत्याकांड : तौसिफ आणि रेहान दोषी

Nikita Tomar Murder

मुंबई :- देशात खळबळ उडवून देणाऱ्या निकिता तोमर (Nikita Tomar) हत्या प्रकऱणातील मुख्य आरोपी तौसिफ आणि त्याचा सहकारी रेहान यांना फरिदाबाद सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. निकिता तोमर (२१)ची गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १ डिसेंबरला सुनावणी सुरु झाली होती. यानंतर तब्बल चार महिन्यांनी आज बुधवारी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.

निकिताच्या अपहरणाच्या प्रयत्नात २६ ऑक्टोबरला हरियाणामधील फरिदाबाद जिल्ह्यात दिवसाढवळ्या गोळी घालून तिची हत्या करण्यात आली होती. तौसिफ आणि रेहान यांनी अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण निकिताने विरोध केला तेव्हा तौसिफने पिस्तूलने तिला गोळी घातली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती.

निकिता दुसऱ्याशी लग्न करणार होती म्हणून तीळ गोळी घातली, असे तौसिफने पोलिसांना सांगितले होते. निकिताच्या कुटुंबाने २०१८ मध्ये दाखल केलेल्या केसमुळे माझे करिअर उद्ध्वस्त झाले, असा दावाही तौसिफने केला होता. “अटक झाल्याने मी मेडिसिनचा अभ्यास करू शकलो नाही. म्हणून मी बदला घेतला, असे तौसिफ म्हणाला होता.

या गुन्ह्याचा तपास एसआयटीने हाती घेतला होता. तौसिफ लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप कुटुंबाने केल्याने पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’च्या अँगलनेही तपास केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER