मुलाच्या विचित्र स्वभावाला कंटाळून आईसह कुटुंबियांनी काढला काटा…

मुंबई: मुलाच्या विचित्र स्वभावाला कंटाळून आईनेच अन्य नातेवाईकांच्या साथीने मुलाची हत्या केली. हत्येनंतर मतदेह पिशवीत भरुन फेकून दिला. मात्र, सांताक्रुझ पोलिसांच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला आहे. निखिल तिर्लोटकर (२८) याच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी त्याचे वडील प्रकाश तिर्लोटकर, बहीण दिपाली, आई ज्योती, भाऊ महेश आणि भाडोत्री रईस अन्सारी यांना यांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ परिसरात मंगळवारी निखिल तिर्लोटकर (२८) नामक तरुणाचा मृतदेह पिशवीत सापडला होता. निखिल हा बेरोजगार होता. यातूनच तो घरच्यांना त्रास द्यायचा. त्याच्या विचित्र स्वभावामुळे घरात खटके उडायचे. त्यातूनच आई वडिलांसह त्याच्या भावंडानी भाडोत्रीच्या मदतीने निखीलची हत्या केली. त्याचा मृतदेह एका मोठ्या पिशवीत भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना अन्सारी याने मदत केली. तपास पथकाने शिताफीने त्यांचे बिंग फोडले. आणि आरोपींना अटक केली.

ही बातमी पण वाचा : खोट्या गुन्ह्यांत फसवणाऱ्यांना सोडणार नाही – बाळुभाऊ धानोरकर