मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’

Aditya Thackrey

मुंबई : येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईची नाईट लाईफ सुरु होणार आहे.

सध्या नाईट लाईफ हे 24 तासआणि 7 दिवस सुरु राहणार असून ही नाईट लाईफ सुरुवातीला रहिवाशी भागात प्रायोगिक तत्वावर सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नसल्याचेही आदित्य ठाकरे यानी सांगितले. मुंबईच्या आधीच अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरु असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे याबाबत जे आरोप करत आहे त्यांना असे वाटते का की मुंबई शहर मागे राहावे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे हॉटेल, मॉल्स, थिएटरमधील उद्योग आणि रोजगार वाढणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.