कोरोनाचा धोका वाढला, राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता

Night curfew

मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणित वाढतच चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचारात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले.

विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही, तर महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पालन करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार केला जात आहे. सर्वसामान्यांनी कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळाव्यात, यासाठी अनेक ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लग्नाचे हॉल किंवा विवाह समारंभांशी संबंधित कार्यालयांवरही कारवाई सुरु करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात साधारण संध्याकाळी 6 ते सकाळी 9 पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सरकारकडून केले जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, संसर्गाचा प्रसार होण्याची गती, बाजारपेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी या सर्व बाबी पाहून नाईट कर्फ्यूबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच जर नाईट कर्फ्यू लागू करुनही परिस्थिती सुधारली नाही, तर कठोर पावलं उचलावी लागतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER