निफ्टीची 14 हाजारांवर : शेअर बाजाराची उसळी

मुंबई :  शेअर बाजारात (stock market) बाजारात लागोपाठ नवव्या आठवड्यात घोडदौड सुरू राहिली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात दहा वर्षांचा उच्चांक मोडीत निघाला. याआधी एप्रिल २०१० मध्ये इतकी लांबलचक साप्ताहिक वृद्धी नोंदविली गेली होती. निफ्टीही पहिल्यांदाच १४ हजार १८ वर बंद झाला. निफ्टीने (Nifty) ३६.७५ अंकांनी उच्चांकी बढत घेतली.

१ जानेवारी २०२१ रोजी सेन्सेक्स ११७.६५ अंकांनी वर चढला आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १० वर्षांचा उच्चांक मोडला होता. स्टेट बँक, एचडीएफसी, टीसीएस, एचसीएल टेक आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी होती. तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात सेन्सेक्स ४८ हजारांच्या उच्चांकी पातळीला भिडू शकतो.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच १८९.२६ लाख कोटी रुपयांच्या पार गेले. चौफेर तेजीमुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर ३,१७० कंपन्यांच्या शेअरचा व्यवसाय जोमात झाला. पैकी २,०४३ म्हणजे जवळपास ६४ टक्के शेअर तेजीसह बंद झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER