निफाड : द्राक्षबागांना धोका कायम, पारा ७.६ अंशावर

नाशिक : निफाड (Nifad) तालुक्यात थंडीचा कडाका कायम आहे. मंगळवारी ६.५ अंशावर घसरलेला पारा बुधवार रोजी सकाळी एक अंशाने वधारत ७.६ अंशापर्यंत आला. मात्र, द्राक्षपंढरीत द्राक्षमणी तडकणे, फुगवण थांबणे हे धोके कायम आहेत. द्राक्षबागांना (grapes farm) दहा अंशापेक्षा कमी तापमान होताच धोके निर्माण होत असतात, असे निफाड तालुक्यातील उगांव येथील प्रगतीशील द्राक्ष बागायतदार सांगतात.

दरम्यान, निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे गाव शिवारात शेकोट्या पेटल्या आहेत. रोज सकाळी व सायंकाळी थंडीत शेकोट्यांभोवती गावगाड्याच्या निवडणुकांचे फड रंगू लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER