निकोलस पूरनने मिळवलेले ‘भोपळे’सुद्धा हेवा वाटण्याजोगे!

Maharashtra Today

क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाला ‘भोपळा’ मिळणे म्हणजे शून्यावर (Zero) बाद होणे आवडत नाही आणि आपल्या कारकिर्दीत या भोपळ्यांच्या नोंदी नकोशाच असतात; पण वेस्ट इंडिजचा फटकेबाज फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) याच्या नावावर मात्र भोपळ्याच्या अशा नोंदी आहेत की कुणालाही हेवा वाटावा. अर्थात त्या भूषणावह नाहीत हे नक्कीच; पण इतर कुणाला त्या कमावतासुद्धा  आलेल्या नाहीत म्हणून हेवा वाटण्याजोग्या! पंजाब किंग्जसाठी (Punjab Kings) खेळणारा हा गडी यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) चार डावांत तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे आणि हे तिन्ही शून्य ‘खास’ आहेत. म्हणजे तो अगदी एकही चेंडू न खेळता, पहिल्याच चेंडूवर आणि दुसऱ्या चेंडूवर भोपळा न फोडता बाद झालाय. हे कमी की काय, म्हणून गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याच्या नावावर तिसऱ्या चेंडूवरसुद्धा  ‘शून्य’ आहे.

त्यामुळे निकोलस पूरन हा आयपीएलमध्ये 0, 1, 2 आणि 3 चेंडूंवर शून्यावर बाद झालेला एकमेव फलंदाज आहे.आता या विक्रमाला हेवा वाटण्यासारखा नाही म्हणणार तर काय? तर यासह त्याने क्रिकेटच्या भाषेतअसणारे डायमंड, गोल्डन,सिल्व्हर आणि ब्राँझ असे सर्व प्रकारचे ‘डक’कमावले आहेत. आता त्याने हे डक कसे कमावले ते बघू या. यंदा निकोलसने बुधवारी सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात डायमंड डक मिळवला. एकही चेंडू न खेळताच तो धावबाद झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो पहिल्याच चेंडूवरपरतला. त्या सामन्यात त्याला ‘गोल्डन डक’ मिळाला.

सीएसकेविरुद्ध तो दुसऱ्या चेंडूवर बाद झाला; पण शून्य होतेच. त्यामुळे त्याने ‘सिल्व्हर डक’ मिळवला. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तिसऱ्या चेंडूवर पण शून्यावरच बाद झाला होता. या प्रकारे ‘ब्राँझ डक’सुद्धा त्याने मिळवला आहे. नशीब की, टी-२० सामन्यात कसोटी सामन्यांप्रमाणे दोन डाव खेळावे लागत नाहीत. नाही तर निकोलस पूरनने ‘पेयर’ आणि ‘किंग पेयर’ असे शून्याचे आणखी दोन प्रकारसुद्धा कमावले असते;पण शून्यातही त्याने जे काही कमावलेय ते नक्कीच हेवा वाटण्याजोगे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button