मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा NIA कडून तपास करण्यात यावा : मनसे

Sandeep Deshpande - NIA - Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ वर फोनवरुन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा NIA कडून तपास करण्यात यावा , अशी मागणी मनसे सरचिटणीस-माजी नगरसेवक संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे .

आमचा मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सुरक्षेवर बिल्कुल विश्वास आहे, ते त्यांची सुरक्षेची। कामगिरी चोख बजावतील. पण आंतरराष्ट्रीय कॉल असल्याने तो कुठल्या दहशतवादी टोळीशी संबंधित आहे का याचाही तपास होणे गरजेचे आहे. . म्हणून NIA तपासाची मागणी करीत आहोत, असे देशपांडे म्हणाले .

दरम्यान ‘मातोश्री’वर दाऊदच्या नावे आलेल्या या धमकीच्या फोनमुळं या ठिकाणी सुरक्षा तातडीनं वाढवण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारू आणि ‘मातोश्री’ निवास्थान बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी या फोनवरुन देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER