एनआयएने अटक केलेल्या एपीआय रियाजुद्दीन काझीचे पोलीस खात्यातून निलंबन

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक कार व ठाण्यातील व्यावासायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेचा (Sachin Waze) सीआययूमधील सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी (Riazuddin Qazi) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) (NIA) अटक केली आहे.

वाझेच्या सूचनेनुसार त्याने पुरावे नष्ट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. रविवारी कोर्टात हजर केले असता त्याला काेर्टाने १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मात्र NIA ने भा. दं. वि. कलम ३०२, २०१, २८६, ४६५, ४७३, १२० (ब), ३४आणि UAPA कायद्याच्या कलम ४ (अ)(ब)(आय) अन्वये काझीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडदेव सशस्त्र पोलीस दलात नेमणूक केलेल्या काझीचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे १० एप्रिलपासून पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सशस्त्र पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्र यांनी माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button