NGT ने राज्य सरकारला ठोठावला दंड

- माथेरान हिल स्टेशन आराखड्याची अमलबजावणी केली नाही

मुंबई : माथेरान हिल स्टेशन संबधीचा गेल्या १५ वर्षांपासून तयार असलेला आरखडा पडून आहे. हा प्रश्न गेल्या १५ वर्ष्यांपासून प्रलंबित आहे. त्या साठी राज्यसरकारला NGT ने चांगेलच धारेवर धरले आणि १ लाख रुपये दंड थोटवला.

मुंबई पर्यावरण ऍक्शन ग्रुप ने दाखल केलेल्या अर्जाला NGT खंडपीठाचे न्यायमूर्ती रघुवंत राठोड आणि तज्ञ सदस्य सत्यवान सिंग गारबेल यांनी उत्तर देत माथेरान हिल स्टेशन अतिशय महत्वाचे आणि पर्यावरण संधर्बातील संवेदनशील विषय असल्याचे सांगितले.

या बाबतचा निर्णय २००३ च्या आधीच्या कायद्या अंतर्गत प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला होता परंतु आतापर्यन्त त्याची अमलबजावणी करण्यात आली नाही. २०१८ मध्ये सुद्धा सुधारित आराखडा पाठवण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने NGT च्या मार्गदर्शनानुसार लवकरात लवकर काम काम सुरु करण्यासाठी सांगितले आहे