…तर पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, यशोमती ठाकूरांचा दावा

Yashomati Thakur

मुंबई : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हेच कायम असायला हवेत. या ठिकाणी जिथे आहात, तिथे तुम्ही राहिल्यास आपण पुढच्या वेळेला स्वबळावर सरकार बनविल्याशिवाय राहणार नाही. एवढा माझा विश्वास आहे. असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलं. मुंबईतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात संध्याताई सव्वालाखे यांचा‌ पदग्रहण‌ कार्यक्रम पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या.

ठाकूर म्हणाल्या की, थोरातांनी महिलांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. थोरातांमुळे दोन महिलांना मंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. कोणी तयार नसताना थोरातांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. तसेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

पुढील काळात काँग्रेसनं स्वबळावर लढावे आणि जास्त जागा जिंकल्या पाहिजेत. विधानसभा निवडणुकीत 12 ते 13 जागा काँग्रेसच्या निवडून येतील, असं बरंच जण सांगत होते. कोणी अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी धुरा सांभाळून काँग्रेसच्या पदरात यश पाडून घेतलं. 16 जागा येतील आणि 44 जागा निवडून आल्या. 44 जागा बोलले असते तर 80 जागा आल्या. बाळासाहेब थोरात आपण प्रदेशाध्यक्ष राहिलंच पाहिजे, पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER