महाराष्ट्रात मान्सूनची पुढील वाटचाल सुरू, १५ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rain

मुंबई : मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला आहे. कालपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलेले असून, भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rains) इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.

१२ जून रोजी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

१३ जून रोजी उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

१४ जून रोजी उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तर १५ जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , ठाणे आणि मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर, उस्मानाबाद मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button