वृत्तपत्रांचे घरपोच वितरण नाही, आदेशाचा पुनर्विचार करा – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis - Newspaper - CM Uddhav Thackeray

मुंबई :- वृत्तपत्रांचे घरपोच वितरण नाही, या आदेशाचा पुनर्विचार करा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सरकारने आज काही उद्योग-व्यवसायांना ताळेबंदीतून वगळले. त्यात वृत्तपत्रांना छपाई करण्याची सूट देण्यात आली; पण वृत्तपत्रे-मासिकांचे विक्रेत्यांतर्फे घरोघरी वितरण करता येणार नाही, असा आदेश दिला आहे. याकडे लक्ष वेधून फडणवीस यांनी लक्षात आणून दिले आहे की, वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण होणार नसेल तर वृत्तपत्र छपाईचा मूळ उद्देश्यच साध्य होणार नाही. आजच्या ‘फेकन्यूज’च्या काळात वृत्तपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन वृत्तपत्र वितरणबंदीच्या आदेशाबाबत फेरविचार करा. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्र सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे, याचा उल्लेख फडणवीस यांनी केला आहे.


Web Title : Newspaper delivery is not distributed, reconsider the order – devendra fadnavis

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)