छोटा राजनच्या निधनाचे वृत्त खोटे; तो अजूनही जिवंत, एम्सचा खुलासा

chota rajan - Maharashtra Today

नवी दिल्ली : तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी काही वेळेपूर्वीच दिली होती. मात्र त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त निराधार असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं स्पष्टीकरण दिल्लीतील एम्स रुग्णालयानं दिलं आहे. छोटा राजन याला कोरोनाची बाधा झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला २७ एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज त्याचं निधन झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पण छोटा राजन जिवंत असल्याची माहिती एम्सने दिली आहे.

तब्बल २६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. नोव्हेंबर २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियामधील बालीतून भारतात आणण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button