नवजात बाळांची काळजी – भाग १ कुमारागार

New Born baby

बाळाची रुम कशी असावी याबद्दल आयुर्वेदात वर्णन केले आहे. आजकाल कौतुकाने आपण नवजात बाळाची रुम सजवतो. आयुर्वेदात कुमारागार ( बाळाची रूम ) कशी असावी हे सांगितले आहे आरोग्य दृष्टीने!

  • जो वास्तुविद्या कुशल ( engg ) आहे त्याच्या सल्ला घेऊन कुमारागार सुंदर अंधकाररहित ( सूर्यकिरण येत असतील) निवात ( तेज हवा येत नसेल), परंतु हवा खेळती असावी (आजच्या भाषेत ventilated) मजबूत असावी.
  • तिथे प्राणी किटक मच्छर उंदीर इ. संचार नसावा.
  • ऋतुनुसार सुखकारक शयन (बेड ) आसन असावे.
  • पाण्याची जागा, शौचालय स्नानाघर, स्वयंपाकघर इ. वेगवेगळे विभाग असावे.
  • कुमारागाराचे धूपन झालेले असावे.
  • अशा कुमारागारात शुद्ध स्वच्छ प्रेमळ हितैषी व्यक्ती असाव्या.
  • बाळाचे शय्या आसन आंथरूण पांघरुण मृदु (नरम) हलके स्वच्छ सुगंधित असावे. मुख्य म्हणजे कोरडे असावे.
  • सर्व धुतलेले वाळलेले कपडे शय्या आंथरूण पांघरुण यावर यव सरसों हिंग गुग्गुळ वेखंड अशोक इ. द्रव्याच्या चुर्णाचा तूप घालून धूपन (fumigation) करावे.

ह्या बातम्या पण वाचा :

त्याकाळी कुमारागार स्वतंत्र बांधले जायचे त्यात स्वयंपाकघर शौचालय स्नानागार असे वेगवेगळे रुम सांगितले आहेत. आजच्या काळात ते शक्य नाही परंतु राहत्या घरातच उपरोक्त सांगितलेल्या गोष्टींचा ( स्वच्छता धूपन ventilation इ.) समावेश नक्कीच करु शकतो. नवजात बाळाची काळजी (neonatal care) हे खूप जबाबदारीचे प्रेमाचे व जिव्हाळ्याचे काम आहे. कुमारागाराचे आयुर्वेदातील वर्णन नवजात बालकांकरीता अनुकरणीय उदाहरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER