नवजात बालकाची काळजी भाग २

Newborn Baby Care

बाळांची रुम किंवा कुमारागार कसे असावे हे आपण मागच्या लेखात वाचले. या लेखात आपण बाळांचे खेळणे कसे असावे याबद्दल आयुर्वेदाचा विचार बघूया. आश्चर्य वाटले ना आयुर्वेद जे चिकित्सा शास्त्र म्हणून आपल्याला माहिती आहे त्यात बाळांच्या खेळण्या विषयी वर्णन आहे!

नक्कीच आहे. बाळांच्या सर्वांगीण विकासाचा करीता खेळणी महत्त्वाची आहेत त्यामुळे ती कशी असावी याबद्दल आयुर्वेदात विचार केला आहे.

बालकस्य क्रीडानकानि – अनेक प्रकारची वेगवेगळी खेळणी असावीत.

काही मधुर शब्द करणारे, दिसायला मनोहारी असावे. बाळाची सर्व ज्ञानेंद्रीय अतिशय नाजूक असतात. त्यामुळे कर्कश आवाज दिसायला भयावह त्यांच्या श्रवणेन्द्रीय व दृष्टीवर वाईट परिणाम करु शकतात.
हलके ( वजनदार नको), टोकदार कडा नसलेले. – बाळ पटकन हातात घेऊ शकतील तसेच हाताला शरीराला टोचणार नाही याकरीता.
– बाळाच्या तोंडात जाणार नाही अशी खेळणी म्हणजेच आकाराने थोडे मोठे असावे.
– खेळण्यांमुळे बाळाला इजा होईल अशी खेळणी नसावी.
– बाळाला भिती वाटेल अशी खेळणी नसावी.

ही बातमी पण वाचा : नवजात बाळांची काळजी – भाग १ कुमारागार

लहान बाळांचे प्राथमिक शिक्षण हे खेळण्यांमधून होत असते. खेळणी शारिरीक व मानसिक विकास होण्याकरीता मदत करत असतात. खेळण्यांव्दारे मजेदार खेळकर आनंदी वातावरणात नवीन गोष्टी लहान मुलं शिकत असतात. त्यामुळे योग्य निवड करणे आवश्यक आहे.

खेळतांना बाळांना जोरात वर फेकणे किंवा एखाद्या गोष्टीचे भय दाखविणे यास वर्ज्य सांगितले आहे. बाळ रडत असेल किंवा जेवत नसेल, कुणाचे ऐकत नसेल तर त्याला एखाद्या गोष्टीची अंधाराची राक्षसाची भिती दाखविणे उचित नाही असे आयुर्वेदात लिहिले आहे. Fear psychosis नावाचा आजार यामुळे होऊ शकतो. घाबरणे वा घाबरवणे, लहानपणासूनच होत असेल तर व्यक्तीत्व विकासाला आपण विचलित करतो.

आजकाल प्लास्टिकचा वापर आपण करू नये असे सांगतो ते शरीराला हानीकर आहे हे सर्वांना माहितीच आहे. लहान बाळ कोवळे, अजाण असतात, कोणतीही वस्तू तोंडात पटकन घालतात त्यांच्याकरीता खेळणी आणण्यापूर्वी विचार नक्की करा. आपण त्यांच्या आरोग्याशी तडजोड तर करत नाहीए ना. त्यामुळे खेळणी घेतांना आयुर्वेदाचा हा विचार नक्की लक्षात ठेवा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER