मेलेल्या माणसांची शिरं जतन करणारी न्यूझीलंडची मोकोमोकई आदिवासी जमात !

Maharashtra Today

इजिप्तमध्ये मृतदेहांना संग्रहीत करुन ठेवण्याची अनोखी पद्धत असल्याचं आपल्याला माहितीये. पिरॅमिड्समध्ये हजारो वर्षापूर्वी पासूनचे मृतदेह तिथं संग्रहित करुन ठेवण्यात आलेत. तिथं संपूर्ण शरिर जसं आहे तसं संग्रहित करुन ठेवण्यात आलंय. पण एक असा आदिवासी समाज आहे, जो फक्त माणसाचं शिर संग्रहित करुन ठेवतो. एका वेळ अशी आली की आदिवासांची ही पंरपरा फायद्याच्या धंद्यात बदलली. याची तस्करी होवू लागली. या संग्रहित शिरांना ‘मोकोमोकई’ (Mokomokai) नावानं ओळखलं जातं.

शिर संग्रही करण्याची अनोखी प्रथा

न्यूझिलंडच्या ‘माओरी’ नावची आदिवासी (New Zealand’s Mokomokai tribe )जमात होती. यांच्यातील परंपरेनूसार त्यांच्या समुहातील सन्मानीय व्यक्तीच शिर संग्रहित ठेवण्यात येतं. माओरी संस्कृतीमधल्या मोठ्या पदावर बसाऱ्या माणसाच्या संपूर्ण चेहऱ्यावर माओरी टॅटू काढण्यात येतो. तर महिलेल्या ओठाच्या खालच्या बाजूला आणि हनुवटीवरती टॅटू बनवण्यात आला.

टॅटू हा माओरी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनाच काढले जात. अशा टॅटूवाल्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचं शिर संग्रहित करण्यात यायचं. अशी शिरं संग्रहित करण्याची प्रक्रियाही निराळी होती. संबंधित व्यक्तीचं शिर त्याच्या मृत्यूनंतर धडापासून वेगळं केलं जायचं. मेंदू बाजूला काढण्यात येई आणि नंतर आतल्या मोकळ्या भागात विशिष्ट प्रकारच्या लाकडाचा भूसा भरला जायचा. यानंतर गरम पाण्यात टाकून ते उकळून त्यावर तेथील वनस्पतींचा लेप लावण्यात येई. यामुळं शिर जसच्या तसं रहायचं. यावर शार्कच्या तेलाचा मुलामाही दिला जायचा.

व्यापारासाठी ‘मोको’ वापरले जात असत

इजिप्तच्या ममीप्रमाणं या शिरांना संग्रहीत केलं जायचं. याला ‘मोको’ हा स्थानिक शब्द वापरण्यात येई. संग्रहण केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाच्या ताब्यात मोको दिला जायचा. नंतर एका सुंदर कलाकृतीच्या डब्यात हे शीर ठेवले जायचे. एखाद्या मंगलमयी दिनी किंवा शुभकार्यावेळी हे मोको बाहेर काढले जात. इतर दिवशी ते असेच संग्रही ठेवले जायचे.

नंतरच्या काळात टोळी युद्धात शत्रु टोळीच्या प्रमुखाच्या शिराचेही मोको बनले जावू लागले. हे बनवण्यामागं त्यांच्या विजयाची आठवण ठेवणं आणि शत्रु सैन्याला धाक दाखवणं ह्या दोन प्रेरणा होत्या. विजयाचे प्रतिक म्हणून शत्रु सैन्याच्या प्रमुखाचा मोको मिरवला जाई. शत्रुला अपमानित करण्यासाठी हे शिर वापरले जायचे. नंतरच्या काळात या शिरांचा वापर व्यापारासाठी होऊ लागला. १८०७ ते १८४२ या काळात मसकट युद्धात व्यापारासाठी या शिरांचा वापर पहिल्यांदा करण्यात आला.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत माओरी आदिवास्यांना हत्यारांची गरज भासू लागली. या गरजेला पुर्ण करण्यासाठी मोकोमोकईच्या व्यापार सुरु झाला.

गुलाम आणि युद्धकैद्यांपासून बनवले जात बनावटी मोको

पुर्वजांच्या शिरं विकली जाऊ नयेत म्हणून त्या समुदायाच्या लोकांनी गुलाम आणि युद्ध कैद्यांपासून मोको बनवायला सुरुवात केली आणि त्यांच्या बदल्यात हत्यारांची खरेदी सुरु झाली. एखाद्याला मारल्यानंतर त्याच्या तोंडावर मोकोचे गोंदण गोंदण्यात येई. जी चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर काढली जायची ती मोको समाजाची नसत. याचा व्यापार जेव्हा शिगेला पोहचला तेव्हा साऊथ वेल्सच्या गव्हर्नरनं यावर बंदी घातली.

गव्हर्नर राल्फ डार्लिंगनं मोको न्यूझिलंडच्या बाहेर न विकण्याच फर्मान काढलं. यानंतर मोकोच्या तस्करीला सुरुवात झाली. १८३१ पर्यंत इंग्रजांनी न्यूझिलंड पुर्णपणे ताब्यात घेतला होता.

ब्रिटीश अधिकाऱ्यानं जमवले ३५ शिर

मेजर जनरल होरासियो गॉर्डन रोब्लो या ब्रिटीश सेना अधिकाऱ्यानं १८६० मध्ये इंग्रज सैन्याच नेतृत्व लॅंड युद्धात केलं. ते सेना अधिकारीत तर होतेच पण सोबतच ते एक कलाकार होते. त्यांना गोंदण कलेवर विशेष अभ्यास करायचा होता.

पुढं त्यांनी टॅट्यूवर पुस्तकही लिहलं. त्यांच पुस्तक १८९६ ला प्रकाशित झालं. न्यूझिलंडमधून त्यांनी जवळपास ३५ शिरं संशोधनासाठी एकत्रित केली होतीय त्यांनी लिहलेल्या ‘माओरी टॅटूइन्ग’ या पुस्तकात मोको अदिवास्यांसंबंधित सविस्तर लिखाण ही केलंय.

नंतर १९०८ ला त्यांनी जमवलेले ३५ शिर न्युयॉर्कच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियमनं १,२६० युरोंमध्ये खरेदी केली होती. जी आजही पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

ही बातमी पण वाचा : तलासचं ते युद्ध ज्यामुळं जगानं ओळखलं  ‘कागदाचं’ महत्व आणि बदलला जगाचा नकाशा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER