न्यूझीलंडच्या खासदाराने घेतली संस्कृतमध्ये शपथ

New Zealand MP takes oath in Sanskrit

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या संसदेत निवडून आलेले भारतीय वंशाचे खासदार डॉ. गौरव शर्मा (३३) (Dr. Gaurav Sharma) यांनी खासदारकीची शपथ संस्कृतमध्ये घेतली. ते लेबर्स पार्टीच्या तिकिटावर हेमल्टन (पश्चिम) मतदारसंघामधून विजयी झाले आहेत.

न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त मुक्तेश परदेशी यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली – “डॉ. गौरव शर्मा हे न्यूझीलंडच्या संसदेमधील सर्वांत तरुण खासदारांपैकी एक आहेत. आज त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. आधी त्यांनी न्यूझीलंडमधील मोरी भाषेत आणि नंतर संस्कृतमध्ये शपथ घेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांशी असणारं त्यांचं खास नातं अधोरेखित केलं.”

एकाने ट्विट करून डॉ. शर्मा यांना विचारले की, हिंदीमधून शपथ घेण्याऐवजी तुम्ही संस्कृतमधून का घेतली? यावर शर्मा यांनी उत्तर दिले – “मी पहारी (माझी मातृभाषा) किंवा इंग्रजीमध्ये शपथ घेण्याचा विचार केला. मात्र सर्वांना आनंदी ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळेच सर्व भारतीय भाषांना (यात मला समजत नाही अशाही काही भाषांचा समावेश आहे) मान देण्यासाठी मी संस्कृतमधून शपथ घेतली. ”

डॉ. शर्मा यांनी नॅशनल पार्टीच्या टीम मॅकिन्डोए यांचा पराभव चार हजारांहून अधिक मतांनी केला. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्येही निवडणूक लढवली होती. ‘द ट्रेब्युन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. शर्मा यांनी सांगितले की, मी १९९६ साली न्यूझीलंडला स्थायिक झालो. सहा वर्षे खूप संघर्ष करावा लागला. माझ्या वडिलांना नोकरी मिळत नसल्याने सहा वर्षे  आमचे खूप हाल झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER