न्यूझीलंडच्या यशाने भारताचा मार्ग बनवला खडतर

न्यूझीलंडच्या यशाने भारताचा मार्ग बनवला खडतर

न्यूझीलंडच्या (New Zealand) वेस्ट इंडिजविरुध्दच्या (West Indies) दणदणीत विजयाने कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत (Test Cricket World Championship) भारताचा (India) मार्ग कठीण बनवला आहे.विंडीजविरुध्दच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने न्यूझीलंडने मोठ्या फरकाने जिंकले. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत ते जवळपास पहिल्या स्थानीच पोहोचले आहेत. पहिल्या स्थानावरील आॕस्ट्रेलियापेक्षा ते केवळ 0.086 गूणांनी मागे आहेत आणि या मुसंडीनंतर आता किवींना मायदेशातच पाकिस्तानशी खेळायचे आहे. पाकिस्तानविरुध्दची मालिकासुध्दा त्यांनी जिंकली तर विश्व कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीला पात्र ठरण्यासाठी भारताला पुढच्या आठ कसोटी सामन्यांपैकी किमान चार तरी जिंकावे लागतील आणि तीन अनिर्णित सोडवावे लागतील. भारताला हे सामने आॕस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या संघांविरुध्द खेळायचे आहेत. त्यामुळे कोहली आणि टीमसमोरचे आव्हान अतिशय कठीण आहे.

कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला अंतिम सामना जून 2021 मध्ये लंडनमधील लाॕर्डस मैदानावर खेळला जाणार आहे.

सध्या जागतिक क्रिकेट क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ 116.461 गुणांसह पहिला आणि न्यूझीलंडचा संघ 116.375 गुणांसह दुसरा आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेची साखळी फेरी 31 मार्च 2021 ला संपणार आहे. त्यात न्यूझीलंडने जर आगामी मालिकेत पाकिस्तानवर 2-0 विजयमिळवला तर त्यांचे पाच मालिकाअंती 420 गूण होतील. दुसरीकडे आॕस्ट्रेलियन संघाने मायदेशी भारतावर विजय मिळवला तर त्यांचेसुध्दा गूण वाढतील आणि भारताला उर्वरीत आठ सामन्यांपैकी किमान चार ते पाच सामने जिंकावे लागतीलआणि किमान तीन अनिर्णित राखावे लागतील.तरच भारतीय संघ न्यूझीलंडच्या पुढे जाईल.

कोरोनामुळे (Coronavirus) काही सामने व मालिका रद्द झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणांकन पध्दतीत बदल केला आहे. पूर्वी मालिका विजयासाठी गूण होते तेंव्हा भारतीय संघ नंबर वन होता पण आता खेळलेल्या मालिकांच्या प्रमाणात सरासरी गूण मिळणार असल्याने भारताला फटका बसला आहे आणि आॕस्ट्रेलियन संघ 82.2 गूणांसह नंबर वन बनला आहे. त्यांनी भारताविरुध्दची मालिका 2-2 आशी बरोबरीत जरी सोडवली तरी 74.17 गुणांसह ते आघाडीवर असतील आणि मालिका 1-2 अशी गमावली तर त्यांचे गूण 70 टक्के होतील. त्यानंतर आॕस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुध्द तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे.

दुसरीकडे न्यूझीलंडने पाकिस्तानविरुध्दचे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 84 टक्के (खेळलेल्या सामन्यांतील उपलब्ध गुणांपैकी 70 टक्के) गूण होतील.

भारताचे सध्या चार मालिकांतून 360 गूणआहेत म्हणजे 90 टक्के. आॕस्ट्रेलिया वइंग्लंडविरुध्दच्या मालिकाअंती भारताला एकूण सहा मालिकाअंती कमाल 720 गूण कमावण्याची संधी मिळालेली असेल. भारताला न्यूझीलंडच्या 84 टक्के गुणांच्या ( खेळलेल्या सामन्यांतील उपलब्ध पैकी 70 टक्के गूण) पुढे जायचे असेल तर 720 पैकी 504 गूण कमवावे लागतील. प्रत्येक कसोटी विजयासाठी 30 गूण मिळतात तर अनिर्णित सामन्याचे 10 गूण मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER