मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या बिहारच्या डीजीपींचा हा अवतार पाहिला का?

पाटणा:बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. दरम्यान, सुशांत सिंह मूळचा बिहारचा. त्याचे कुटुंब पाटणा येथे वास्तव्यास असल्यामुळे सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांच्या कामावर संशय व्यक्त करत त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत तक्रार दिली व बिहारच्या डीजीपीसह बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर पाटणा पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन  करण्यात आले होते.

 या संपूर्ण घडामोडीत बिहारचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (DGP) गुप्तेश्वर पांडे यांची एन्ट्री झाली. डीजीपी पांडे यांनी मुंबई पोलिसांवर वारंवार टीका केल्याने ते हिंदी माध्यमांसाठी नायक बनले होते. त्यानंतर आता पांडे आपल्याला नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. “डीजीपी गुप्तेश्वर पांडे, रॉबिनहूड बिहार के” या गाण्यात थिरकताना दिसणार आहेत.

बिग बॉस सीजन-१२ मधील गायक दीपक ठाकूर याच्या रॉबिनहूड बिहार के…  हे गाणं गुप्तेश्वर पांडे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं दीपकनं गायलं असून त्यानेच निर्मितही केलं आहे. या गाण्याचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी हे संपूर्ण गाणं लोकांना पाहायला मिळेल.

या गाण्यात गुप्तेश्वर पांडे हे दीपकसोबत एक्टिंगही करताना दिसत आहे. दीपकने या गाण्याचा ट्रेलर त्याच्या यू-ट्युब चॅनेलवर प्रसिद्ध केला आहे. या गाण्याचा पोस्टर रिलीज केले आहे.  त्यात गुप्तेश्वर पांडे  सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्यामागे दीपक उभा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER