तेजस्विनीचे न्यू व्हर्जन

Tejaswini Pandit

स्मार्टफोन आणि इंटरनेटवर सतत भटकंती करत असणाऱ्यांसाठी न्यू व्हर्जन हा शब्द काही अनोळखी नाही. वेगवेगळ्या ॲपमध्ये सतत नवीन व्हर्जन काय आहे हे शोधण्यासाठी या नेटकऱ्यांची बोटं स्क्रीनवर लागलेली असतात. पण सध्या न्यू व्हर्जन हा शब्द अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने अधिक हॉट केला आहे. माझे जुने व्हर्जन डिलीट करा आणि माझे न्यू व्हर्जन बघून कमेंट करा अशी हटके कॅप्शन देत तिच्या हॉट अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. या फोटो मधील निळ्या रंगाच्या ड्रेस मधील तेजस्विनीचा लूक बघून चाहत्यांकडून मिळत असलेल्या कमेंट्सच्या वर्षावात तेजस्विनी चिंब झाली नसेल तरच नवल!

तेजस्विनी अभिनेत्री म्हणून आपल्याला माहिती आहेच, पण तेजाज्ञा या ब्रँडसाठी आणि फॅशन बुटीक संचालिका म्हणून देखील तिचं काम आहे. अभिनेत्री आणि मैत्रीण अभिज्ञा भावेसोबत तिचा साडी डिझाईनचा ब्रँड आहे. अर्थातच तिच्या सोशल मीडिया पेजवर नेहमीच वेगवेगळ्या साड्यांमधील फोटो तेजस्विनी शेअर करत असते. अभिनेत्री आणि मॉडेलिंगची जाण असल्यामुळे अनेकदा स्वतः डिझाइन केलेल्या साड्या नेसून तेजस्विनी तिचे फोटो अपलोड करत असते. त्यामुळे बरेचदा तेजस्विनीचे चाहते तिला लेटेस्ट स्टाईलच्या साड्यांमध्ये बघत असतात.

तसा सिनेमांमध्ये तेजस्विनीचा हॉट अंदाज चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतोच. सध्या तेजस्विनीचा लो कट ड्रेस मधील खास अंदाज घायाळ करणारा आहे. खरेतर तेजस्विनी लहानपणापासून खूप धाडसी मुलगी आहे. तेजस्विनी सांगते, लहानपणी घरासमोरच्या चौकात अनेकदा मी मुलांशी भांडण करून यायचे तेव्हा आई म्हणायची कि अगं जरा मुलीसारखी वाग.

तेजस्विनीचा स्वभावच मुळात अरे ला कारे करण्याचा आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा बोल्डनेस तिच्यामध्ये कायमच आहे. सध्या तिने शेअर केलेले तिचे हॉट फोटो बघून तिच्या चाहत्‍यांना देखील तिचा हा नवा लूक खूपच आवडला आहे.

तेजस्विनी सांगते, आम्हा कलाकारांना अनेकदा भूमिकेनुसार आपले लूक बदलावे लागतात. सिनेमा मालिका यामधील भूमिका जशी असेल त्याप्रमाणे हेअर स्टाईलपासून ते ड्रेसपर्यंतचा लूक करावा लागतो. तर आपण ज्या प्रोफेशनमध्ये असतो त्यानुसार देखील आपल्याला अनेकदा ड्रेसिंग सेन्स जपावा लागतो. मी साड्यांचा ब्रँड चालवत असल्यामुळे मी डिझाईन केलेल्या साड्या ड्रेस नेसून फोटो शेअर करत असते. गेल्या काही दिवसांमध्ये मी आणि अभिज्ञाने खूप मोठ्या प्रमाणात पारंपारिक साड्यांचे डिझाईन केले आहे. त्यामध्ये अगदी नऊवारी साड्यादेखील आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये माझ्या सोशल मीडिया पेजवरचे जर फोटो पाहिले तर मी अनेकदा साडी किंवा पारंपरिक ड्रेस मध्येच चाहत्यांना दिसत आले होते मात्र आता जरा यात बदल करावा असं मला वाटलं आणि म्हणूनच वेस्टर्न ड्रेस मधला फोटो शेअर करण्याचा मोह मला झाला, अर्थातच या नव्या लूकचा मला देखील स्वतःला खूप आनंद झाला आहे.

अग बाई अरेच्या या सिनेमातून तेजस्विनी पंडितने मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित सिनेमातील तेजस्विनीने साकारलेली सिंधुताईंची भूमिका तिच्या अभिनय कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरली आहे. याशिवाय येरे येरे पैसा, तु ही रे यासारख्या सिनेमात तिचा बोल्ड अंदाज अभिनयातून तिच्या चाहत्यांनी पाहिलाच आहे. हंड्रेड डेज या मालिकेत तिने साकारलेली गुढ भूमिका प्रेक्षकांची पसंती मिळवणारी होती. सध्या तेजस्विनीने संपूर्ण लक्ष तेजाज्ञा या तिच्या साडी डिझाईनर ब्रँड वर केंद्रित केले आहे. याशिवाय वेगवेगळ्या जाहिराती आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातूनही तेजस्वीनी तिच्या चाहत्यांना दर्शन देत असते, पण सध्या मात्र तिचा न्यू व्हर्जन अशी कॅप्शन लिहिलेला हॉट फोटो तुफान व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER