सलून चालकाच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट ; सीसीटीव्ही व्हिडिओमधून समोर

New twist in salon driver death case - Maharastra Today

मुंबई :- औरंगाबादमध्ये बुधवारी सलून चालकाचा मृत्यू झाला . पोलिसांच्या मारहाणीत फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. तसेच मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांविरोधात आक्रमक भूमिका घेत मृतदेह थेट पोलीस स्थानकातच नेला. मात्र आता एक सीसीटीव्ही व्हिडिओ (Salon CCTV Video) समोर आला असून या सगळ्या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर दुखापत हे असल्याचं डॉक्टरांनी सांगितले होते . मात्र सलून चालक फिरोज खान हे पोलिसांशी बोलताना चक्कर येऊन पडल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे. तसेच फिरोज खान यांना पोलिसांनी मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही. या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे आता या घटनेनं नवं वळण घेतले असून यापुढे आणखी काय खुलासा होतो, हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button