नवे वळण नवे कलाकार 

शंतनु मोघे

मराठी मालिका (Marathi Serial) नेहमीच नवीन विषयावर आधारित मालिका घेऊन येत असतात. सोनी मराठीवरील (Sony Marathi) ” स्वराज्य जननी जिजामाता ” (Swarajya Janani Jijamata) या मालिकेत लवकरच काहीतरी वेगळं वळण बघायला मिळणार आहे.या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय आता लवकरच या मालिकेत काहीतरी वेगळं वळण बघायला मिळणार म्हणून प्रेक्षक उत्सुक आहेत. या मालिकेत लवकरच एक नवा अभिनेता काम करताना बघायला मिळणार आहे. कोण आहे हा मराठी नवा कलाकार बघूया.

प्रिया मराठे (Priya Marathe) हिने तिच्या सोशल मीडियावरून (Social Media) एक खास पोस्ट शेयर करत अभिनेता शंतनू मोघे या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारणार असल्याची बातमी तिने दिली आहे. प्रिया ने तिच्या नवऱ्याबद्दल एक खास पोस्ट लिहीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिया आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणते ” ह्या उत्तुंग व्यक्तीमहत्वालाही तू न्याय देखील यात शंका नाही , आतुरतेने वाट बघतोय. खूप खूप शुभेच्छा ” अभिनेता शंतनु मोघे या मालिकेत ” शहाजी महाराज ” (Shahaji Maharaj) यांची भूमिका साकारणार असल्याने प्रियाने एवढ्या खास आणि प्रेमळ शब्दात आपल्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.  या मालिकेत आता एक रंजक वळण येताना दिसत आहे. या मालिकेत आता एक रंजक वळण येणार आहे. यावेळी मालिकेत अनेक बदल होतानाही दिसणार आहे. या मालिकेत आता जिजाऊंची भूमिका भार्गवी चिरमुले साकारत आहे. तर या मालिकेत दादोजी कोंडदेवांच्या व्यक्तिरेखेत डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहेत. कणखर जिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी तर त्यागी पित्याच्या भूमिकेत म्हणजेच शहाजी राजांच्या भूमिकेत शंतून मोघे दिसणार आहेत.

” स्वराज्य जननी  जिजामाता  ” या मालिकेत आता लावकरच आपल्याला अभिनेता शंतनू  मोघे दिसणार आहे. शंतनू ” शहाजी महाराजांची ” भूमिका साकारणार असल्याचं समजतंय. ही मालिका काहीतरी वेगळ्या ट्रक वर बघायला मिळणार आहे. या आधी देखील शंतून ने चित्रपटात काम केलंय. उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट दिसण्याची भारदस्त अभिनयाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून आज शंतनू या मालिकेत दिसणार आहे.  कॅरी ऑन मराठा , पॉयजन , शूर आम्ही सरदार अश्या अनेक चित्रपटातुन त्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. लॉक डाऊन आणि बाकी सगळे नियम पाळत सगळेच कलाकार शूट करतात. शंतनू ने ये आधी झी मराठीवरील ” स्वराज्य रक्षक संभाजी ” या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज ” यांची भूमिका साकारली आहे.

लॉकडाऊन नंतर मुंबईत शूट होणारी ही पहिली मालिका आहे. सोनी मराठी आणि मालिकेची सगळी टीम अगदी सगळे नियम पाळून शूट करतात. ही ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अनेक बड्या काळकरांची फौज असलेली ही मालिका प्रेक्षकांना आवडते आहे. ऐतिहासिक गोष्ट आणि उत्तमोत्तम कलाकार यामुळे ही मालिका एका वेगळ्याच उंचीला आहे. खुद्द निर्माते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी या मालिकेचं निर्मिती केली आहे. अभिनेत्री अमृता पवार , स्नेहा मंगल , अमोल जांडे ,स्वप्नील पाटील अश्या कलाकारांनी या मालिकेत महत्त्व पूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

आता या मालिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अभिनेता शंतनू मोघे खास व्यक्तीरेखा साकारताना बघायला मिळणार आहेत. ही मालिका वेगळ्याच आणि उत्सुकवर्धता उंचीवर आहे आणि या मालिकेत काहीतरी वेगळं वळण बघायला मिळणार आहे.मालिकेला आलेलं रंजक वळण आणि नव्या कलाकारांची दमदार एंट्री या दोन्ही कारणा ने मालिका नक्कीच अजून खूप ट्विस्ट घेऊन येणार आहे यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER