पंढरपूर निवडणुकीच्या निकालात नवे वळण ; अ‍ॅड. नितीन मानेंचा राष्ट्रवादीशी काहीही संबध नाही

Sharad Pawar - NCP Letter

मुंबई : पंढरपूर निवडणुकीच्या निकालात भाजपाचे (BJP) समाधान आवताडे (Samadhan Autade) यांचा विजय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला . राष्ट्रवादीकडून पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणारं पत्र फिरू लागलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या बातमीवर खुलासा केला आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या बातमीवर खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, अ‍ॅड. नितीन माने (Nitin Mane) या नावाचा व्यक्ती स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य असल्याचं भासवत असून त्याचे लेटर हेडदेखील बनविले आहे. त्या लेटरहेडचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलच्या नावाचा गैरवापर करून विविध निवेदन आणि तक्रारी देत आहे. मात्र अ‍ॅड. नितीन माने, मुंबई याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button