नवा स्ट्रेन : या तक्रारी असतील तर करा कोरोनाची चाचणी

Coronavirus new Starin - Maharastra Today

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे देशात रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या नव्या नवीन कोरोना संसर्गाचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होतो. रुग्णांमध्ये उलट्या, अस्वस्थता, पोटदुखी आणि अतिसार यासारखी लक्षणे दिसतात.

दिल्लीतील दोन शासकीय रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांना पोट दुखणे, उलट्या होणे आणि अतिसार अशी लक्षणे दिसली आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, नवीन कोरोना स्ट्रेनमुळे रूग्णांच्या तब्येतीवर वेगळ्या प्रकारे परिणाम होत आहेत. दिल्लीत कोरोनाची जवळपास ६.५० लाख प्रकरणे आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला अशी लक्षणे आहेत.

यासोबत, आधीसारखेच वास येत नाही आणि अन्नाची चव कळत नाही, अशी लक्षणे नवीन कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये आढळतात. राजीव गांधी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णांमध्ये पोटदुखी आणि अस्वस्थतेच्या तक्रारी आढळल्या आहेत. यातील बहुतेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

पाच महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त

गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची ५३,४७६ प्रकरणे समोर आली आहेत, २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाची नवीन प्रकरणे आल्यानंतर देशात एकूण रूग्णांची संख्या एक कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर गेली आहे. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३ लाख ९५ हजार १९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER