व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच नवे स्टिकर फिचर

Whatsapp Sticker

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये (WhatsApp) नेहमी नवनव्या फिचर्सचा समावेश होत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅपवर रिड लेटर आणि मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे फिचर येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या स्टिकर शॉर्टकट (Sticker Shortcut) फिचरवर काम करत आहे.

स्टिकर्सव्दारे यूझर्स आपले म्हणणे अधिक चांगल्या पध्दतीने सांगू शकतात. तसेच आपल्या भावनाही व्यक्त करू शकतात. नव्या फिचरचे काम आपल्यासाठी स्टिकर शोधणे सोपे बनवणे आहे. हे फिचर आपल्या चॅट बारमध्ये दिसेल. जेव्हा केव्हा आपण इमोजी किंवा विशेष शब्द टाईप कराल, तेव्हा चॅट बारमध्ये वेगळ्या प्रकारचा आयकॉन दिसायला लागेल. याचा अर्थ असा की, त्या शब्द किंवा इमोजीशी अनुसरून स्टिकरही उपलब्ध आहे.

जर आपल्याला हे स्टिकर पहायचे असेल, तर आपल्याला किबोर्ड आयकॉनवर टॅप करावे लागेल. ज्यामुळे स्टिकर समोर येईल. येथूनच त्याचा वापर करणेही शक्य होणार आहे. म्हणजेच, स्टिकर फिचर मध्ये जाउन, शब्द टाईप करून शोधण्याची मेहनत संपणार आहे. सध्याच्या घडीला फिचरचे टेस्टिंग केले जात आहे. जे काही दिवसात बीटा यूझर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

स्टिकर शॉर्टकट फिचरवर काम करण्यासोबतच व्हाट्सअ‍ॅपने आपल्या नव्या अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅप्ससाठी नवे अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅक उपलब्ध केले आहेत. नव्या पॅकचे नाव Sumikkogurashi आहे. जे साईज मध्ये २.४ MB आहे. या पॅकचा वापर व्हाट्सअ‍ॅप वेब यूजर्स देखील करू शकतील. यूझर्सना हा पॅक वापरण्यासाठी sticker store येथून डाउनलोड करावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER