तेजस ठाकरेंचा नवा शोध, सह्याद्रीच्या पर्वतरांगात शोधला ‘हिरण्यकेशी’ मासा

Tejas Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली . या माश्याची ही 20 वी प्रजाती आहे. आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.

हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव ‘हिरण्यकेशी’ (Hiranyakeshi) असं ठेवण्यात आलं आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा असा आहे. माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस ठाकरे यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा जे रिसर्च पेपरचे प्रमुख आहेत, यांचे सहकार्य मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER