मंगळावर रेकार्ड झाला हेलिकॉप्टरचा आवाज!

Maharashtra Today

नवी दिल्ली : नासाने(NASA) मंगळावर पाठविलेल्या यानाने मंगळावर हेलिकॉप्टरच्या(#MarsHelicopter) उडण्यासारखा आवाज रेकॉर्ड केला आहे. हा आवाज कमी उंचीवरून उडणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पात्यांचा आवाजसारखा आहे!

नासाच्या सहा चाकी रोव्हरमध्ये रेकाॅर्ड झालेल्या फुटेजमध्ये हा आवाज रेकाॅर्ड झाला आहे. रोव्हरने ३० एप्रिलला हा आवाज रेकाॅर्ड केला होता. याबाबतचा एक व्हिडीओ नासाने त्यांच्या ट्विटर आकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तीन मिनटांचा असून यामध्ये दूरवर हेलिकाॅप्टरचे पाते फिरत असल्याचा आवाज ऐकू येतो.

जेझेरो क्रेटरवर बेल्ड फिरल्याने वाऱ्याचा आवाज होत असून ही ब्लेड २,४०० rpm या वेगाने फिरत आहेत. हा आवाज ८७२ फूट उंचावरून येतो आहे! हा आवाज खराच हेलिकॉ़प्टर किंवा अन्य कोणत्या यानाचा आहे की वाऱ्याचा याबाबत मिशन सांभाळणारेही साशंक आहेत.

दरम्यान, प्लॅनेटरी सायन्सचे प्राध्यपक डेव्हीड मिमोउन यांनी म्हटले आहे की, मंगळा ग्रहावर असा आवाज येणे हा आमच्यासाठी सुखद धक्का आहे. रोव्हर या यंत्रामध्ये असे सेन्सर आहेत जे रोव्हरसमोरील दगडांचा अभ्यास करतात. यामध्ये कॅमेरा आणि उच्च प्रकारचा मायक्रोफोन आहे. याच मायक्रोफोनमध्ये हा आवाज टिपण्यात आला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button