आणखी काय पोचपावती हवी?; राज ठाकरेंच्या ट्विटवर केदार शिंदेंची प्रतिक्रिया

Kedar Shinde - Raj Thackeray

मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांची नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ असं त्यांच्या आगामी मालिकेचे नाव आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या मालिकेचे कौतुक केले आहे. त्यामुळेच आपल्या कामाची पोचपावती मिळाली , असे म्हणत केदार शिंदेंनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे आभार मानले आहेत.

केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. हे मालिका पाहण्यास राज ठाकरे यांनीदेखील ट्विट करत त्यांची उत्सुकता व्यक्त केली. यावर आणखी काय पोचपावती हवी??? सुख येणार. आपण ते स्वीकारायला तयार हवं”, असा रिप्लाय केदार शिंदे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER