सोशल मीडियावरुन होणारे गैरप्रकार रोखण्यसाठीच नवे नियम, केंद्राचे स्पष्टीकरण

Social Media Apps - Ravi Shankar Prasad

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून व्हॉट्सॲप (Whatsapp) आणि अन्य सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारने (Central Government) जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावलीवरून चांगलाच वाद रंगला आहे. केंद्र सरकारचे नवे नियम पाळण्यास व्हॉट्सॲपने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यातच आता यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, यावर आता केंद्राने स्पष्टीकरण दिले असून, नवे नियम हे सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी केले आहेत. युझर्सनी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केले आहे.

रविशंकर प्रसाद यांनी ‘कू’ या स्वदेशी ॲपवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नवीन आयटी नियम हे केवळ सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आहेत, त्याचा यूजर्सना कोणताही धोका नाही. त्यामुळे यूजर्सनी घाबरु नये, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत ठरलेला एखादा आक्षेपार्ह मजकूर कोणी पाठवायला सुरुवात केली याची खातरजमा करणे आणि अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठीच हे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲप यूजर्सना या नव्या नियमांना घाबरण्याची गरज नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. एखाद्या मजकुरामुळे देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि सुरक्षा धोक्यात येत असेल तर किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न, बलात्कार, बालकांचे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर त्यावर परिणामकाररित्या नियंत्रण या नवीन नियमांमुळे आणता येईल, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button