श्रीरामनवमी साजरी करण्यासाठी नवी नियमावली; सरकारच्या सूचना

Restrictions - Rama Navami

मुंबई :- राज्यभरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लादण्यात आलेले आहेत. यातच आता श्रीरामनवमीसाठीही (Ram Navami) नवी नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे. रामनवमी उत्सव साजरा करताना सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

महत्त्वाच्या सूचना

१. श्रीरामनवमी उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु या वर्षी कोरोनामुळे लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हा उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
२. दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. मंदिरात पूजेसाठी जाता येणार नाही. तसेच मंदिरात भजन, कीर्तन किंवा इतर कोणते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
३. मंदिराच्या व्यवस्थापकांनी शक्य असेल तर ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी.
४. प्रभातफेरी आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
५. कोरोना रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या इतर निर्बंधांचे काटेकोर पालन करावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button