नागपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध ; किराणा व भाजीपाला विक्री सकाळी ११ पर्यंतच

Vegetables - Groceries - Nagpur Municipal Corporation

नागपूर :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नागपुरातही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचे संक्रमण अनियंत्रित झाले आहे. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला आहे. त्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातर्फे आणखी कडक पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. या अंतर्गत नागपुरातील संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. औषधांची दुकाने सोडून अत्यावश्यक सेवेत येणारी किराणा, डेअरी, भाजीपाल्यासह चिकन, मटण, मासे विक्रीची व इतर वस्तूंची दुकानेही आता सकाळी ११ पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. त्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुधारित आदेश जारी केले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहील.

नागपुरातील परिस्थिती पाहता, आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पोलिसांनाही आदेश देण्यात आले आहेत की, त्यांनी रस्त्यावर कुणालाही विनाकारण फिरू देऊ नये. त्यामुळे मंगळवारपासून ही संचारबंदी अधिक कडक झालेली दिसून येईल. जागोजागी नाकाबंदी राहील. कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर नागरिकांनीसुद्धा आपली जबाबदारी पार पाडायला हवी. त्यांनी घरीच राहावे, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

काय सुरू राहील?
वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स, वृत्तपत्रे, मीडियासंदर्भात सेवा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (५० टक्के क्षमतेने), बांधकाम (साईटवर लेबर उपलब्ध असल्यास), बँक व पोस्ट सेवा, कोरोना लसीकरण व चाचणी केंद्र, अत्यावश्यक सेवेतील उद्योग व कारखाने, वकील व सीए यांची कार्यालये, किराणा दुकान, बेकरी (सकाळी ७ ते ११ पर्यंत), दूध विक्री, फळ विक्री (सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत) , भाजीपाला विक्री व पुरवठा, रस्त्यावरील हातठेले; चिकन, मटण, अंडी, मासे दुकाने, पशुखाद्य दुकाने, ऑप्टिकल दुकाने, खते व बियाणे (हे सर्व सकाळी ७ ते ११ पर्यंत), निवासाकरिता असलेले हॉटेल, लॉज (फक्त हॉटेलमध्ये निवासी ग्राहकासाठी रात्री ११ पर्यंत किचन सुरू ठेवता येईल.

हे बंद राहतील
शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद, मात्र पूजाअर्चा करता येईल. आठवडी बाजार, उद्याने, रेस्टाॅरेंट, हॉटेल, खाद्यगृहांमधील डायनिंग सुविधा बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू, स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा, व्यायामशाळा, जिम शासकीय व निमशासकीय कार्यालय (अत्यावश्यक सेवा वगळून) क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत. सर्व खासगी आस्थापना, कार्यालये पूर्णपणे बंद; मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह.

Restrictions Order NMC 19April 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button