‘आंदोलनजीवी’ देशात जन्माला आली नवी जमात ! त्यांच्यापासून सावध रहा, मोदींचा सल्ला

PM Narendra Modi - Rajya Sabha

दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) संदर्भात, देशातल्या कोणत्याही आंदोलनात उडी घेणाऱ्या नेत्यांवर व राजकीय पक्षांवर टीका करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणालेत, देशात ‘आंदोलनजीवी’ हि नवी जमात जन्माला आली आहे. कोणतेही आंदोलन असो, हे तिथे हजर असतात. जनतेने त्यांच्यापासून सावध रहावे.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते म्हणालेत, श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे ‘आंदोलनजीवी’. वकिलांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे कुणाचंही आंदोलन असो, हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी हजर असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढे. यांची एक टोळी आहे. हे आंदोलनांशिवाय जगूच शकत नाहीत! आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात.

हे लोक असे सर्व ठिकाणी जाऊन वैचारिक भूमिका मांडत असतात, लोकांची दिशाभूल करत असतात. नवनव्या गोष्टी सांगतात. त्यांना स्वतःला नीट उभे राहता येत नाही ते दुसऱ्याच्या आंदोलनात जाऊन बसतात; हीच त्यांची ताकद आहे! हे सर्व आंदोलनजीवी ‘परजीवी’ असतात. आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल तुम्हाला अशा परजीवी आंदोलनकर्त्यांचा अनुभव येतच असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER