महाराष्ट्रात लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर, सामान्यांसाठी लोकल प्रवास बंद

CM Uddhav Thackeray - Lockdown

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात गुरूवार २२ एप्रिलपासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.

नवी नियमावली नेमकी काय?

१) सरकारी कार्यालयात फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम होणार

२) खासगी कार्यालयातही ५ कर्मचारी किंवा अधिकाधिक १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक

३) लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी, 2 तासांची वेळमर्यादा, नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड

४) खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड

५) राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल, इतर सर्व कार्यालयांमध्ये ५ कर्मचारी किंवा १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.

अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार. सामान्यांसाठी लोकल, मोनोरेल, आणि मेट्रो प्रवास करता येणार नाही.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button