नव्या कायद्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल : सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर : भाजप (BJP) सरकारने जिओ आणून बीएसएनएल अडचणीत आणले. अगदी तसेच नव्या शेतकरी कायद्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी भीती गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली. आज गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नव्या कृषी विधेयकाविरोधात आंदोलन केले.ते कोल्हापुरात बोलत होते.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ, नवे शेतकरी धोरण व कामगार कायद्याविरोधात आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजप हटाव देश बचाओच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

पालकमंत्रीपुढे मंत्री पाटील म्हणाले, आज महात्मा गांधी यांची जयंती, त्यांच्या विचाराला हरताळ फासण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. नवे शेतकरी घोरण, कामगार धोरण आणून त्यांना अडचणीत आणण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. हे होऊ नये यासाठी भाजपने हे कायदे मागे घ्यावेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER