नव्या नायिकांनाही ओढ आलिशान गाड्यांची

Priyanka Chopra Car

आपली एक चार चाकी गाडी असावी असे अनेकांचे स्वप्न असते. मध्यमवर्गिय तर अनेक वर्ष हे स्वप्न पहात असतो. काही जणांचेच स्वप्न पूर्ण होते. आता हप्त्यावर गाड्या मिळत असल्याने तरुण मुले लगेचच चार चाकी घेतात आणि आई-वडिलांना गाडीतून फिरवतात. मध्यमवर्गियांना गाड्यांसाठी कष्ट करावे लागतात मात्र बॉलिवूडमधील कलाकारांना कोट्यावधी रुपये मिळत असल्याने ते कोट्यावधी रुपयांच्या गाड्या घेतात. हो गाडी नव्हे तर गाड्या घेतात. त्यांच्या गॅरेजमध्ये गाड्या ठेवायला जागाही नसते. काल आलेल्या नायिकांच्या घरीही अशीच परिस्थिती असते. अगदी आलियापासून सारापर्यंत नव्या पिढीतील नायिकांना आलिशान गाड्यांचे वेड असून त्यांच्या एक-दोन नव्हे तर अनेक आलिशान गाड्या आहेत.

सोळाव्या वर्षापासून नायिकेची भूमिका साकारीत असलेली आलिया भट्ट सध्या प्रचंड व्यस्त आहे. तिचे काही चित्रपट प्रचंड हिट झाल्याने तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. अशी ही आलिया गाड्यांची फार मोठी शौकीन आहे. आलियाकडे ऑडी क्यू7, रेन्ज रोव्हर वोग आणि बीएमडब्ल्यू 7-सीरीजच्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत कोट्यावधी रुपये आहे.

Alia Bhatt

तेलुगु चित्रपटातून अभिनयाला सुरुवात करणारी आणि आता बॉलिवूडमध्येही (Bollywood) यश मिळवून आघाडीची नायिका झालेल्या तापसी पन्नूलाही गाड्यांची खूप आवड आहे. तापसीकडे मर्सिडीज-बेंझ जीएलई असून ही तिची आवडती गाडी आह असे वाटते. कारण चित्रपटांच्या सेटवर वा इव्हेंटला तापसी याच गाडीतून आलेली दिसते. तसे पाहिले तर तापसीकडे जीप कंपास एसयूव्हीसुद्धा आहे. ही गाडी तापसीने तिची बहीण शगुनला वाढदिवसाची भेट म्हणून देऊन टाकली. आता तापसीने आणखी एक नवी आलिशान मर्सिडीझ गाडी घेतली आहे.

Judwaa 2 Actor Taapsee Pannu Buys Mercedes-Benz GLE

युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी अभिनेत्री दिशा पटानीचे नाव जोडले गेले होते. केवळ काही प्रसंगांमध्ये हे दोघे एकत्र दिसल्याने अशी चर्चा सुरु झाली. परंतु या दोघांमध्ये तसे काही नाही. दिशाने स्वर्गीय सुशांतच्या ‘एम एस धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’तून चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. दिशालाही गाड्यांची आवड असून तिच्याकडे मर्सिडीज़-बेंझ ई-क्लास ही आलिशान गाडी आहे. यासोबतच दिशाकडे रेंज रोव्हर स्पोर्ट ही अत्यंत महागडी गाडीही आहे.

Disha Patani

स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने काही वर्षांपूर्वीच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. करण जोहरने ‘धडक’ चित्रपटातून जान्हवीला रुपेरी पडद्यावर आणले. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी जान्हवीचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गुंजन सक्सेना- दी कारगिल गर्ल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला होता. जान्हवीला लहानपणापासूनच गाड्यांची आवड असून तिच्याकडे अत्यंत महाडगी अशी मिर्सडीज-मेबॅक आणि बीएमडब्ल्यू एक्स 5 या दोन गाड्या असून आता काही दिवसांपूर्वीच तिने मर्सिडीज़-बेंझ जीएलएस ही आणखी एक आलिशान कारही खरेदी केली आहे.

Janhvi Kapoor

मॉडेल म्हणून नाव कमवल्यानंतर कृती सेननने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. बॉलिवूजमध्येही तिने यश मिळवले असून ‘पानीपत’ सारखे अनेक मोठे चित्रपट तिने केले आहेत. आजही तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. कृतीलाही गाड्यांचे वेड असून तिच्याकडे बीएमडब्ल्यू 3-सीरीज आणि ऑडी क्यू 7 एसयूव्ही या दोन अत्यंत आलिशान आणि महागड्या गाड्या आहेत. कृती बी़एमडब्ल्यूमधूनच सगळीकडे फिरताना दिसते.

Kriti Sanon's New Car - Kriti Sanon's Audi Q7 Car | GQ India

काही दिवसांपूर्वी ड्रग्ज घेण्याच्या प्रकरणात सारा अली खानचे नाव आले होते. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी असलेल्या साराने 2018 मध्ये सुशांत सिंहसोबत ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर रणबीर कपूरबरोबर सुपरिट ‘सिंबा’ चित्रपटातही तिने काम केले होते. नवाबी खानदानातील साराला गाड्यांची आवड असून तिच्याकडे पाच ते सहा आलिशान गाड्या आहेत. यात जीप कम्पास आणि होंडा सीआरव्ही, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू गाड्यांचा समावेश आहे.

Sara Ali Khan

या यादीत प्रियांका चोप्राचे नाव मुद्दाम सगळ्यात शेवटी ठेवले आहे. याचे एक कारण असे की, ती अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये असून अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. दुसरे कारण असे की तिच्याकडे सगळ्यात महाग म्हणजे सात कोटी रुपये किमतीची आलिशान घोस्ट सीरीजमधील रोल्स रॉयस ही गाडी आहे.

Priyanka Chopra

या यादीवरून तुम्हाला कल्पना येईल की नायिकांनाह नायकांप्रमाणेच आलिशान गाड्यांची आवड असून त्यासाठी कोट्यावधी रुपये त्या खर्चायला तयार असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER