शेतकरी आंदोलनाचा नवा फॉर्म्युला : एक ट्रॅक्टर, १५ शेतकरी आणि १० दिवस

farmers protes

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायदयाच्या (Agriculture Law)विरोधात अडीच महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी भारतीय किसान यूनियनचे (Indian Farmers Union)राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी ‘ एक ट्रॅक्टर, १५ शेतकरी आणि १० दिवस’ असा फॉर्म्युला घोषित केला आहे.

राकेश टिकैत म्हणालेत, प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टरवर १५ शेतकरी आणि १० दिवसांचा वेळ घेऊन या. त्यामुळे या आंदोलनात शेतकरी सहभागी होत राहतील आणि परत जाऊन शेतीही करू शकतील. शेतकरी संघटनांचे नेते सरकारशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहेत. मात्र सरकारला चर्चा करायचीच नाही. सरकार हे आंदोलन दीर्घकाळ चालू देण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र आपल्याला हे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला असून मागण्या मान्य झाल्या नाही देशभरात ४० लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.

६ फेब्रुवारीला ‘चक्का जाम’

संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारीला ‘चक्का जाम’ करण्याची घोषणा केली आहे. दुपारी १२ ते ३ हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनात रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER