व्हॉट्सॲपवर आलं नवीन फिचर

WhatsApp.jpg

नवी दिल्ली : देशातील मोबाईल धारकांसाठी एक नवीन खुशखबर मिळाली आहे. आपल्या व्हॉट्सॲपवर नवीन फिचर आलं आहे. यात Android आणि ios दोन्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप (WhatsApp) ग्रुपवरील चॅटचे नोटिफिकेशन्स कायमचे म्यूट करण्याचा ऑप्शन आहे.

आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर असे अनेक ग्रुप असतात त्यांचा संदेश आपल्याला काहीच उपयोगाचा नसतो. त्यात कौटुंबीकपासून ऑफिशिअलपर्यंत ग्रुप असतात. याशिवाय काही ग्रुपमधील चॅटचा कधी- कधी विनाकारक आणि नाहक त्रासही होत असतो. यामुळे ते वेळीच नाहिसे करण्याची आवश्यकता असते.

यामुळे सध्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ग्रुप्समध्ये ‘Always Mute’ हा ऑप्शन दिल्याचे सांगितले. यात व्हॉट्सॲप ग्रुपच्या Mute Notifications सेटिंग्जमध्ये गेल्यास आपल्याला One Week आणि 8 Hours सोबत Always हा ऑप्शन दिसेल. याआधी याठिकाणी Always ऐवजी 1 Year चा ऑप्शन मिळत होता. म्हणजेच सध्या व्हॉट्सअप ग्रुपचे सेटिंग्स बदलून जास्तीत-जास्त एक वर्षापर्यंत म्यूट करू शकत होते. आता एखादा ग्रुप म्यूट झाल्यावर त्या ग्रुपमधील कोणतेच नोटिफिकेशन्स मिळणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER